केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात, पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे. ही स्थिती सर्वच पक्षांत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा. देशात सुशासन असायला हवे, […]