ठाणे

अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज प्रवाह सुरू

अंबरनाथ (प्रतिनिधी):

अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यामधून उच्च वीज प्रवाह सुरू देखील झालेला आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल 2000 मेगा वेट अतिरिक्त वीज यामुळे मिळणार आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात आला आहे त्यांचे भूसंपादन न करता त्या शेतकऱ्यांच्या नावावरतीच राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळालेला असून तारांच्या खाली शेती भाजीपाला लागवड कुक्कुटपालन शेळीपालन गोपालन असे व्यवसाय देखील करता येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *