बांगलादेशमध्ये जातीय तेढ सातत्याने वाढत आहे. सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठी घोषणा केली आहे. हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर बंगालमधील पेट्रापोलमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आंदोलन करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे कारवाई […]
राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाचा वाद अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याबाबत आज कोर्टात सुनावणी घेण्यात आली. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला ३६ तासांत वृत्तपत्रांमध्ये विशेषत: मराठी वृत्तपत्रात एक डिस्क्लेमर जारी करण्याचे आदेश दिले होते. आजच्या सुनावणीत कोर्टाच्या आदेशानुसार दिलेल्या जाहिरातीबाबत अजित पवार गटाच्या वकिलांनी कोर्टाला माहिती दिली. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल […]
उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसोबतच देशभरात अनेक ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. राजस्थानच्या देवली-उनियारा जागेवरही पोटनिवडणूक होत असून, आज येथे मतदानादरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. एका अपक्ष उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? आपले निवडणूक चिन्ह ईव्हीएम मशीनमध्ये स्पष्टपणे दिसत नसल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार […]
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान
महाराष्ट्रात मतदानाला अजून आठवडा शिल्लक असताना तिकडे झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. ४३ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. दुपारी प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि त्याच्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात निम्म्याहून अधिक जागांवर मतदान होत आहे. प्रचारासाठी उमेदवारांना खूपच कमी कालावधी मिळालेला […]
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान
हिंसाचाराच्या ताज्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 20 अतिरिक्त कंपन्या मणिपूरला पाठवल्या आहेत. यात सुमारे 2,000 जवान आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री या जवानांना तातडीने हवाई मार्गाने पाठवून तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार […]
सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर
कर्नाटकात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची कुणकुण लागली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) मोठा आरोप केला असून काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच, आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेले नाही. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातूनच सत्तेवर आले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या […]